JSON Variables

business कसा करायचा ? | business ideas small scale


business कसा करायचा ? | business ideas small scale


How to do business :


चला तर आज आपण business म्हणजेच उद्योगधंदा कसा करायचा, व्यवसाय कसा करायचा ते जाणून घेऊया… तर बऱ्याच जणांना एक कॉमन प्रश्न पडतो की माझ्याकडे भांडवल नाहीये तर मग मी उद्योग धंदा, व्यवसाय कसं करू. तर मला असं वाटतं की भांडवल असताना उद्योग करणे ही काही उद्योजकता नाही तर भांडवल नसताना उद्योग करणे ही खरी उद्योजकता आहे.
तर आपण पहिलं काय केलं पाहिजे तर आपण पहिले ओळख निर्माण केली पाहिजे. ओळख हीच खरी पहिली आपली भांडवल आहे. आणि ओळखच आपल्याला पहिली निर्माण करावी लागेल. लोक तुमच्यावर विश्वास कधी ठेवतील ? लोक तुमच्याबरोबर व्यवहार कधी करतील ? लोक तुमच्याकडून वस्तू केव्हा खरेदी करतील ? या सगळ्यांचा समूह म्हणजे ओळख. म्हणून ओळख यातील पहिली पायरी आहे. ओळख निर्माण करायची असेल तर आपल्याला आपला ॲटीट्युड बदलावा लागेल, आपण सकारात्मक झाल पाहिजे. आपल्याकडे हेल्पिंग ॲटीट्युड हवा म्हणजेच दुसऱ्यांची मदत केली पाहिजे त्यातून ओळख वाढते. आपण प्रत्येक माणसाशी असे वागले पाहिजे की त्याने आपल्या सोबत चांगले नाते ठेवले पाहिजे आपण समोरून त्यांच्याशी स्मितहास्य करा. त्यांच्याशी सौजन्याणे तसेच नम्रपणे वागा. संकटाच्या वेळी त्यांच्याजवळ धावून जा. अशाप्रकारे लोकांबरोबर ओळख बनवा. आपण असं काहीतरी कौशल्य निर्माण केलं पाहिजे, जर आपल्याकडे वस्तू नसतील समोरच्याला द्यायला, सेवा नसतील देण्यासारख्या काही नसेल पण बोलायला चार शब्द आहेत. जर आपण चार शब्द समोरच्याशी चांगले बोलू शकलो तरी चांगली ओळख निर्माण होईल. म्हणून पहिली ओळख निर्माण करा. एकदा का ओळख निर्माण झाली की तुमची कुठलीही वस्तू विकली जाईल. मग ते काहीही असू देत. कारण आपली ओळख मजबूत आहे. म्हणून उद्योगधंद्यामध्ये ओळख मूळ गाभा आहे. एकदा का तुम्ही ओळख निर्माण केली की त्यातून एक सर्कल तयार होत एक नेटवर्क तयार होतो. आणि जेवढा मोठा तुमचा सरकल तयार होईल तेवढेच जास्त लोक तुम्हाला ओळखतील. तेवढ्याच जास्त लोकांना तुम्ही सेवा देऊ शकाल. म्हणजेच जेवढा मोठा तुमचा धंदा होईल एवढाच मोठा नफा सुद्धा होईल. जर तुम्हाला नफा जास्त हवा असेल तेवढीच तुम्हाला ओळख सुद्धा करावी लागेल. नफा जास्त हवा असेल तर धंदा जास्त करावा लागेल आणि जर धंदा जास्त हवा असेल तर ओळख जास्त करावी लागेल. ओळख मोठी करायची असेल तर इतरांपेक्षा काहीतरी वेगळ करण्याची तयारी ठेवायला हवी. ओळख असली की उद्योगधंद्यामध्ये काही कमी पडणार नाही. म्हणून लक्षात घ्या आज हिंदी लोक अंगावर कपडे नसतानाही आपल्याकडे येऊन त्याने उद्योगधंदे केले आणि ते कुठच्या कुठे गेलेत. त्यांच्याकडे काय पिकत आहे, काही नाही ते आपल्याकडे येऊन धंदे करतात . खरं सांगायचं झालं तर अर्धा कॅनडा त्यांनी जिंकला आहे याबाबतीत. म्हणून चांगल्या प्रकारे आपण ओळख निर्माण करा, म्हणजे एखादा रस्त्यात भेटला तर तो बोलला पाहिजे की हा माणूस चांगला आहे, हा माणूस विश्वासू आहे अशाप्रकारे ओळख निर्माण करा. लोकांमध्ये तुम्ही पॉप्युलर व्हा . म्हणजेच लोकांनी तुम्हाला नावासकट कृतीसकट ओळखलं पाहिजे अशी स्वतःची एक इमेज तयार करा. असे केल्याने पैसा तुमच्या मागे येईल तुम्हाला पैशाच्या मागे जाण्याची गरज भासणार नाही.

business
business

औद्योगिक क्षेत्रात मंदी येण्याची अनेक कारणे असू शकतात आणि हि मंदी लगेच येत नाही लहान मंदी एक दोन दशकांनी आणि मोठी समस्या निर्माण झाल्यावर येणारी मंदी हि १०० वर्षांतून एक किंवा दोनदा असू शकते. इथे तुम्हाला फायदा, नफा हे बघायचेच नाही तर कमीत कमी नुकसान कसे होईल ह्यावर भर द्यायचा आहे. एक दोन वर्षे तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करायचा आहे आणि ह्यासाठी तुम्ही मानसिक दृष्ट्या सक्षम असणे
खूप गरजेचे आहे. ह्या काळात जो कोणी नफा मिळवून देण्याच्या बोलेल ते तुम्हाला फसवण्यासाठी. पहिले मानसिक स्वास्थ्य जपा आणि त्यानंतर पैसा. आज उद्योग व्यवसाय बंद पडला तर हमाली करा कारण हे दिवस देखील जातील व परत तुम्ही तुमचा उद्योग व्यवसाय हा उभा करू शकतात. दीर्घकालीन लढ्यासाठी तयार रहा, फक्त हार माणू नका.
बऱ्याच जणांना दुसरा प्रश्न पडतो की व्यवसाय (business) करायचं आहे पण कोणता करायचा ?
तर मी तुम्हाला काही नावे सांगतो त्यातून नफा हा मिळणारच. त्यातलाच एक म्हणजे 👇
• Transportation म्हणजेच वाहतूक.
तर मित्रांनो वस्तु असू द्या किंवा मनुष्य असूद्या त्याला एका जागेवरून दुसर्‍या जागी जावेच लागेल. वस्तूंमध्ये सांगायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक वस्तू, किराणा वस्तू असा अनेक काही आहेत आहेत तरी यांच्यासाठी वाहतुक ही लागणारच.
तसेच दुसरं सांगायचं झालं तर..
आज मुंबईत सॅन्डविच ४० रूपयाने विकतात परप्रांतीय काय असते त्यात दोन ब्रेड, ग्रिनचटनी,बटाट्याची एक काप, टॉमेटो ची एक काप,आणि सॉस एका सॅन्डविच मागे
किमान २५ रुपये सुटतात,१५ रुपये खर्च दिवसाला १००
सॅन्डविच गेले तर १००x२५ = २५०० दिवसाला महिन्याचे
७५००० हजार ,त्यातुन BMC,जागेच भाडे,गॅस आणि इतर
२५०००रु गेले तरी ५०,०००रु महिन्याच उत्पन्न आहे,
मराठी माणसं का करत नाही….
फ्रुट सलाड २० रुपये प्लेट विकतात एका कलिंगड मधे १५
प्लेट पकडले तरी ३०० रुपये होतात… कलिंगड १२० ।
रुपयाचा १८० रुपये नफा… दिवसाला १०० प्लेट गेल्या तरी
७४० रूपये दिवसाचा नफा महिन्याचा २२,२०० हे मी
नॉर्मल सांगतोय यापेक्षा जास्त मार्केट आहे.
बरेच धंदे आहेत… छोटे वाटत असले तरी खुप प्रॉफिट
आहे. मराठी माणसा विचार कर अजुनही वेळ गेलेली नाही.

Post a Comment

0 Comments